आता PUC नसेल तर मिळणार नाही – वाहन अपघात विमा !
IRDA चे आदेश- खूप महत्वाचे अपडेट – प्रत्येकाने वाचा
जर PUC प्रमाणपत्र नसेल विमा कंपन्यानी विमा पॉलिसीचे नुतनीकरण करु नये,यासंदर्भात IRDA म्हणजेच भारतीय विमा प्राधिकरणाने नोटिफिकेशन जाहीर केले आहे.
हे आपण व्यवस्तीत समजून घेऊ ?
IRDA ने म्हटले आहे कि वाहनांचा विमा काढण्यासाठी – यापुढे वाहनांचे PUC म्हणजेच Pollution Under Control Certificate असणे आवश्यक आहे – म्हणजे हे PUC प्रमाणपत्र नसेल तर विमा चे पैसे भरून सुद्धा – वाहन विमा मिळणार नाही. यासंदर्भात आयआरडीएने नोटिफिकेशन जाहीर केले आहे.
PUC ला मराठी मध्ये आपण *वाहन प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र* असे म्हणू शकतो – याबातची माहिती जरी IRDA ने आता दिली असली तरी हा नियम २० ऑगस्ट २०२० पासून लागू झाला आहे-असे [IRDA]भारतीय विमा प्राधिकरणाने स्पस्ट केले आहे.
तसेच कंपन्या आणि ग्राहकांना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचं कसोशीनं पालन करण्यास सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाने विमा कंपन्यांना आदेश दिले होते की, त्यांनी संबंधित वाहनाची पीयूसी तपासल्याशिवाय विम्याचे नुतनीकरण करु नये.
प्रदुषण तपासणी केंद्रं प्रामुख्याने पेट्रोल पंपांवर असतात – त्यांच्या जवळ जाऊन आपल्या वाहनाचे PUC प्रमाणपत्र त्वरित बनून घ्या.
तसेच आपल्या जवळचे PUC सेंटर पहायचे असल्यास – puc centre near me असे गुगल वर सर्च करा.
*IRDA चा हा नियम* लागू झाला आहे – हि माहिती प्रत्येक वाहन मालकांसाठी खूप महत्वाची आहे – आपण इतरांना अवश्य शेअर करा.
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
Comments are closed.