बँक अकाऊंट मधून पैसे चोरीला गेल्यास काय करावे ? तुमचे पैसे कसे व किती परत मिळतील !

तुमच्या बँक खात्यातून चोरी झाल्यानंतर – किंवा फ्रॉड झाल्यास तुमचे पैसे कसे व किती मिळतील – RBI ने दिली खूप महत्वाची माहिती – प्रत्येकाने वाचा.

रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून वारंवार फ्रॉड पासून वाचण्याचा सूचना ग्राहकांना देण्यात येत आहेत. तरी देखील ग्राहकांच्या ATM / बँक खात्यातून पैसे चोरी झाल्यास तुम्ही काय केले पाहिजे याची माहिती-आरबीआयने त्यांच्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.

फ्रॉड झाल्यास काय करावे सविस्तर समजून घ्या :-

▪ आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार खात्यातून अनधिकृत व्यवहार किंवा फसवणूक झाल्यास बँकेला तीन दिवसांच्या आतमध्ये याबाबत लेखी स्वरूपात सूचित करा.

▪ यामध्ये जर तुमच्या चुकीमुळे हे अनधिकृत व्यवहार किंवा फसवणूक झाले नसल्यास बँक तुम्हाला पूर्ण नुकसान भरपाई देईल.

▪ मात्र जर फसवणूकिची माहिती तुम्ही बँकेला 4 ते 7 दिवसांच्या दरम्यान दिली,तर या प्रकरणात आपल्याकडे मर्यादित दायित्व असेल म्हणजेच, अनधिकृत व्यवहाराच्या नुकसानाचा काही भाग तुम्हाला सहन करावा लागणार.

पण पैसे परत किती मिळतील ?

हे सुद्धा पहा !

पैसे किती परत मिळतील हे लायबिलिटी वर ठरते – जर तुमचे बँक खाते बेसिक सेव्हिंग बँकिंग डिपॉझिट खाते म्हणजे झिरो बॅलेन्स खाते आहे तर तुमची लायबिलिटी 5 हजार रुपये असेल – म्हणजे जर तुमच्या खात्यातून 10 हजार रुपयांचे अनधिकृत ट्रान्झॅक्शन झाले असेल तर तुम्हाला 5 हजार रुपयेच परत मिळतील – उर्वरित 5 हजार रुपयांचे नुकसान तुम्हाला सहन करावे लागेल -अशीच बचत खात्याची लायबिलिटी 10000 रुपये असेल.

यामध्ये आपण लक्षात घ्या :-

RBI ने दिलेल्या माहिती नुसार अनधिकृत व्यवहाराचे पूर्ण पैसे हवे असल्यास आपल्या बँकेत तीन दिवसाच्या आत तक्रार करणे अनिवार्य आहे, तर 4 ते 7 दिवसानंतर लायबिलिटी नुसार पैसे दिल्या जातात.

  •  मात्र जर आपण 7 दिवसानंतर बँकेला माहिती दिली असेल – तर बँकेच्या मंडळावर आहे – की ते तुमची लायबिलिटी कशी ठरवतात.
  •   अशा परिस्थितीत तुमची बँक लायबिलिटी माफ देखील करू शकते – मात्र आपण शक्य असल्यास तकारहि तीन दिवसाच्या आत मध्येच करा – जेणेकरून तुमचे पूर्ण पैसे परत मिळतील.
  • बँक खात्यातून झालेल्या अनधिकृत व्यवहाराची तक्रार हि आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात सुद्धा करा जेणे करून पैसे परत मिळण्यास मदत होईल.

 *दरम्यान  हि माहिती* –  प्रत्येक नागरिकांसाठी खरोखर खूप महत्वाची आहे – आपण थोडस सहकार्य करा – इतरांना देखील शेअर करा.

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट  :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search