जिल्हा वार्षिक योजना वैरण बियाणे व ठोंबे वितरण योजना बाबत माहिती.
District Annual Plan Seed distribution scheme maharashtra.
योजनेचा उद्देश –
राज्यातील वैरण तुट काही प्रमाणात कमी करणे,पशुपालका कडील उत्पादकता वाढविणे जास्तीतजास्त दुध उत्पादनासाठी पशुधनास पुरेशी पोषणमूल्य हिरवी वैरण उपलब्ध करणे,यासाठी शेतकऱ्याच्या शेतावर सुधारित प्रजातीच्या वैरणीचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हि योजना असून सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी लागू आहे.
योजनेच्या लाभाचे स्वरूप-
प्रती लाभार्थी १ एकर क्षेत्र मर्यादेत 100 % अनुदान,अधिकतम मर्यादा रु.६०० प्रती लाभार्थी.
योजनेच्या प्रमुख अटी-
१.वैरण पिकाच्या लागवडी करिता जमीन उपलब्ध असावी.
२.लाभार्थी शेतकऱ्या कडे कमीत कमी ३ ते ४ पशुधन असणे आवश्यक.
अर्ज कोठे करावा –
संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जिल्हा परिषद कार्यालय मध्ये अर्ज लिखित स्वरुपात आवश्यक कागदपत्रासह करणे आवश्यक आहे.
Comments are closed.