UPI Payment करण्यावर येणार आता मर्यादा ! प्रत्येकाने वाचा*

UPI Payment Limit.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्सनुसार, आता यूजर दररोज यूपीआय च्या माध्यमातून पेमेंट करताना 1 लाख रुपयांपर्यंतचेच व्यवहार करू शकणार आहेत.

यामध्येदेखील काही छोट्या बँका हे लिमिट 25 हजारांपर्यंत आणू शकतात. आपण वापरत असलेल्या प्रत्येक ॲपनुसार हे नियम/लिमिट वेगळे असतील , असेही NCPI ने सांगितले आहे.

UPI Payment *पहा कशी असेल मर्यादा*

  • Amazon Pay द्वारे पेमेंट करणाऱ्यांना 1,00,000 रुपयांपर्यंत पैसे पाठवता येतील. Amazon Pay UPI रजिस्ट्रेशननंतर पहिल्या 24 तासांत तुम्हाला फक्त 5000 रुपये पाठवता येऊ शकतात. तर बँकेने 20 व्यवहार करता येणार आहेत.
  • PayTM  वर यूपीआय पेमेंट लिमीट तासानुसार बदलते. यूपीआयने युजर्ससाठी 1 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा निश्चित केली आहे.
  • PayTM वर आता यूजर एका तासात 20,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्स्फर करू शकणार नाहीत. तसेच, प्रत्येक तासाला या अ‍ॅपद्वारे जास्तीत जास्त 5 यूपीआय व्यवहार होऊ शकतात आणि यूजरला एका दिवसात फक्त 20 व्यवहार करता येणार आहेत.
  • Google pay transaction limit per day in india गुगल पे आणि फोनपेने दररोजची यूपीआय व्यवहार मर्यादा 1,00,000 रुपये निश्चित केली आहे. फोनपेवर बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार यूपीआयद्वारे व्यवहाराची मर्यादा 10 किंवा 20 पर्यंत आहे.
  • या दोन्ही ॲप्समध्ये पैसे पाठवण्यासाठी तासाची मर्यादा नाही. मात्र एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला 2000 रुपयांपेक्षा अधिक रकमेची ‘मनी रिक्वेस्ट’ सेंड केली तर ते ट्रान्झेक्शन होणार नाही.

*यूपीआय पेमेंटवर मर्यादा येणार* – हि बातमी आपण ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांना नक्की शेअर करा.

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search