SC,ST उमेदवारांनाही मिळणार खुल्या प्रवर्गातून नोकरी-महत्वाची माहिती !!
SC,ST उमेदवारांनाही मिळणार खुल्या प्रवर्गातून नोकरी–सर्वोच्च न्यायालयाचा खूप महत्त्वपूर्ण निकाल..
सरकारी नोकऱ्यामध्ये खुल्या प्रवर्गातील रिक्त जागा सर्वांसाठीच उपलब्ध आहेत ,खुला प्रवर्ग हा कोटा नाही,असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रवींद्र भट आणि न्यायमूर्ती हृषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने दिला आहे.
पहा कशी होती याचिका :–
याचिकाकर्त्यांपैकी एक महिला इतर मागास प्रवर्ग, तर दुसरी महिला अनुसूचित जातीतील आहे. आता या दोघींनी 2013 मधील उत्तर प्रदेश पोलीस दलातील कॉन्स्टेबल भरतीची परीक्षा दिली होती.
दरम्यान खुल्या प्रवर्गातून नोकरी मिळवलेल्या महिला उमेदवारापेक्षा आपल्याला अधिक गुण मिळाले होते. मात्र असे असतानाही केवळ इतर मागास प्रवर्गातील असल्यामुळे खुल्या प्रवर्गातून नोकरी मिळाली नाही,असा आरोप याचिकाकर्त्या सोनम तोमर यांनी केला ,त्यावर न्यालयाने खूप महत्व पूर्ण निकाल दिला आहे.
पहा काय सांगितले सर्वोच्च न्यायालयाने :-
सर्वोच्च न्यायालयाने सांगितले राखीव कोटय़ातील उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील नियुक्तीसाठी हक्कदार आहेत,तसेच खुला प्रवर्ग हा कोटा नाही. हा प्रवर्ग सर्व जाती-जमातींतील पुरुष-महिला उमेदवारांसाठी खुला आहे.
त्यामुळे इतर मागास प्रवर्ग, अनूसुचित जाती-जमाती यांसारख्या राखीव कोटय़ातील उमेदवारांचीही गुणवत्तेच्या आधारे – खुल्या प्रवर्गातील रिक्त जागांवर नियुक्ती केली जाऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पस्ट सांगितले आहे.
*सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल* – सर्व जाती-जमातींतील उमेदवारांसाठी खरोखर खूप महत्वाचा आहे , आपण वेळ काढून इतरांना देखील अवश्य शेअर करा.
हे सुद्धा वाचा :-
>> अर्ज एक-योजना अनेक : शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती !
>> 1 जानेवारी 2021 पासून ‘या’ मोबाईलवर बंद होईल WhatsApp !
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद… सर