नवी मुंबई महानगरपालिकेच्या “आरोग्य” विभागात विविध 188 जागांची भरती.

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2018.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापने वरील आरोग्य विभागामधील “गट-क” पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची तारिख दि. 21/09/2018 पर्यंत आहे.

1.स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ :- 130 जागा.
वेतनश्रेणी :- रु.9300-34800 ग्रेड पे रु.4200/-
शैक्षणिक पात्रता :- महाराष्ट्र नर्शिंग कोंन्सिलची जनरल नर्शिंग किंवा मिडवाईफर पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Sc नर्शिंग पदवी उत्तीर्ण व महाराष्ट्र नर्शिंग कोंन्सिलची नोंदणी आवश्यक.

2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ :- 04 जागा.
वेतनश्रेणी :- रु.9300-34800 ग्रेड पे रु.4200/-
शैक्षणिक पात्रता :- भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्र किंवा सूष्मजीवशास्त्र या विषयामध्ये पदवीधर. हाफकीन संस्था किंवा मान्यताप्राप्त संस्थेची वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान मधील पदव्युत्तर पदवीका किंवा Bsc (उपयोजित)पदवी.

3.ई.सी.जी तंत्रज्ञ :- 07 जागा.
वेतनश्रेणी :- रु.9300-34800 ग्रेड पे रु.4200/-
शैक्षणिक पात्रता :- भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र मधील पदवी उत्तीर्ण.व ECG तंत्रज्ञ पदाचे प्रशिक्षण पूर्ण.

हे सुद्धा पहा !

4.रक्तपेढी तंत्रज्ञ :- 03 जागा.
वेतनश्रेणी :- रु.9300-34800 ग्रेड पे रु.4200/-
शैक्षणिक पात्रता :- भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्र किंवा सूष्मजीवशास्त्र या विषयामध्ये पदवीधर. हाफकीन संस्था किंवा मान्यताप्राप्त संस्थेची वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान मधील पदव्युत्तर पदवीका किंवा Bsc (उपयोजित)पदवी.

5.ऑक्झीलरी नर्स / मिडवाईफ :- 32 जागा.
वेतनश्रेणी :- रु.5200-20200 ग्रेड पे रु.2400/-
शैक्षणिक पात्रता :-10 वी पास व ANM अभ्यासक्रम पूर्ण.महाराष्ट्र नर्शिंग कोंन्सिलची नोंदणी आवश्यक.

6.शस्त्रक्रियागृह सहाय्यक :- 12 जागा.
वेतनश्रेणी :- रु.5200-20200 ग्रेड पे रु.2000/-
शैक्षणिक पात्रता :- 12 वी जीवशास्त्र विषयासह उत्तीर्ण व रुग्णालयातील शास्त्रक्रियागृह सहाय्यक कामाचा 3 वर्षाचा अनुभव.

वयोमर्यादा :- 18 वर्ष ते 40 वर्ष पर्यंत वयात पदानुसार विविधता. [ नियम नुसार सूट लागू ]
परीक्षा फी :- खुला प्रवर्ग :- रु.400/- व  मागासवर्गीय :- रु.325/-
प्रवेशपत्र :- दि.05/10/2018 पासून उपलब्ध होतील.
परीक्षा :- दि.13/10/2018 ते 16/10/2018 (संभाव्य)

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा ”.

जाहिरात पहा.

APPLY ONLINE.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More