सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 09/01/2021

🪀 *सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट ०९- जानेवारी-२०२१ – शनिवार*

📣 राज्यात 2021 मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे , अर्ज करण्यासाठी 18 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली – असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे

📣 भारतातील प्रमुख विमान कंपनी एअर विस्ताराने – आपल्या प्रवाशांसाठी एक जबसदस्त ऑफर आणली आहे – या अंतर्गत इकॉनॉमी क्लासमध्ये १२९९ रुपयांत देशभरात कोणत्याही ठिकाणी प्रवासाची संधी देण्यात येत आहे

📣 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 जानेवारीला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ऑनलाइन बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोना लसीकरणाचा फायनल प्लॅन ठरण्याची शक्यता आहे.

📣 स्टेट बँकऑफ इंडिया ने शुक्रवारी ८ जानेवारीला गृहकर्जावरील व्याज दर, 0.30 टक्क्यांनी कमी केले- तसेच प्रोसेसिंग फी सुद्धा पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली आहे – यामुळे SBI च्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे

📣 चोवीस तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हक्काची सुटी द्यावी – अशी मागणी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

📣 फ्लिपकार्ट ने आपल्या ऑनलाईन शपिंग वेबसाईटवर , आता मराठी भाषाही उपलब्ध केली आहे , तसे तुम्हाला माहिती असेल मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांची बोली भाषा आहे.

📣 भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटीमध्ये प्रवेशासाठीची , GATE परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होईल – दरम्यान या परीक्षेचे प्रवेशपत्रं काल ८ जानेवारी पासून उपलब्ध झाले आहे – gate.iitb.ac.in

📣 वित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार जेव्हा एखाद्या महिन्यात , एका ग्राहकाने 10 लाख किंवा त्याहून अधिक किंमतीचे दागिने विकले असतील तेव्हाच , केवायसीचे कागदपत्र द्यावे लागतील , अन्यथा त्याची आवश्यकता भासणार नाही

📣 एखाद्या कोविड योद्धय़ाचा मृत्यू झाला ,तर त्याला पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत 50 लाखांची भरपाई दिली जाते – मात्र या योजनेचा लाभ 55 वर्षांखालील कोविड योद्धय़ांपुरताच मर्यादित आहे, असे काल शुक्रवारी ८ जानेवारीला केंद्र सरकारने सप्स्ट केले

📍 *सर्व अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More