सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 19/01/2021
सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट १९ जानेवारी २०२१ मंगळवार
???? राज्यात आठवड्यातील चार दिवस २८५ केंद्रांवर लसीकरण होणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती – दरम्यान या आठवड्यात आज मंगळवार, बुधवार, शुक्रवार तसेच शनिवारला लसीकरण होणार आहे –
???? तर राज्यातील लसीकरण केंद्रांवर दिवसभरात १०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे हे उद्दिष्ट आहे – असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले
???? व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक सीईटी सेलकडून जारी करण्यात आले – तर वेळापत्रक अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध झाले आहे
???? पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी – 1 फेब्रुवारी 2021 पासून पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक , नॉन-ईएमव्ही एटीएम मशीनद्वारे व्यवहार करू शकणार नाहीत – बँकेने ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली आहे
???? दक्षिणेकडून उष्ण वारे उत्तरेकडे वाहत असल्याने राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली – दरम्यान राज्यात अजून किमान दोन दिवस हीच परिस्थिती राहणार -असे हवामान विभागाने सांगितले
???? धक्कादायक माहिती देशभरात 580 जणांना कोरोना लसीचे साईड इफेक्ट्स दिसून आलेत – तर सात जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे – दरम्यान यावर आता केंद्र सरकार स्पष्टीकरण येणार आहे
???? राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. रात्री उशिरापर्यंत आलेल्या निकालांमध्ये – भाजपाने एकूण ३ हजार २३६ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत –
???? शिवसेनेला २ हजार ८२० ग्रामपंचायतींमध्ये , तर राष्ट्रवादी काँग्रेसला २ हजार ९९७ ग्रामपंचायतींमध्ये – तसेच काँग्रेसला राज्यात २ हजार १३१ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला आहे
???? राज्यात अपघातातील कारणांमध्ये वाहनचालक शारीरिकदृष्ट्या फिट नसणे ,हे एक प्रमुख कारण झाले आहे – त्यामुळे वाहनचालकांची लवकरच आरोग्य तपासणी करण्यात येईल – असे काल राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले
???? *सर्व अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा.
???? हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Start Update”.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.