सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 19/02/2021
सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट १९ फेब्रुवारी 2021 शुक्रवार
???? राज्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत त्यामुळे कडक उपाययोजना करण्याची गरज आहे असं, परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.
???? अकोला जिल्ह्यात येत्या रविवारी म्हणजेच २१ फेब्रुवारी रोजी संपूर्ण लॉकडाउन राहणार आहे – असे अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले
???? आरोग्य मंत्रालयाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या , त्यानुसार यात्रेपूर्वी एअर सुविधा पोर्टलवर सेल्फ डिक्लेरशन फॉर्म जमा करावा लागेल.
???? तसेच कोव्हिड निगेटीव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्टही अपलोड करावी लागणार. हा रिपोर्ट 72 तासांपेक्षा जुना नसावा – दरम्यान ह्या गाईडलाईन्स 22 फेब्रुवारीच्या रात्री 11.59 वाजेपासून लागू होतील.
???? औरंगाबाद शहरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी घेतलाआहे , या नव्या नियमानुसार फक्त इयत्ता 10 वी ते 12 चे वर्ग सुरु असणार आहेत , इतर सर्व वर्ग बंद असतील.
???? मुंबईत लग्न समारंभाच्या मंगल कार्यालयात 50 पेक्षा अधिक व्यक्ती एकावेळी आढळल्यास संबंधित व्यक्तिंना दंड होणार आहे.
???? कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आवर घालण्यासाठी नागपुर जिल्ह्यात , कोणत्याही कार्यक्रमासाठी आता आठ दिवस आधी परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
???? महाराष्ट्रातील शासकीय कर्मचार्यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला – राज्य सरकारने *आरक्षणाशिवाय* रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे.
???? अमरावती जिल्ह्यात दर आठवड्यात शनिवार रात्री 8 ते सोमवारी सकाळी 8 पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
???? पेट्रोल डिझेलच्या दरात अजून पण दरवाढ होत आहे – आज सुद्धा पेट्रोल डिझेलच्या दरात 30 ते 35 पैशांपेक्षा वाढलं आहे ,
???? *तसे आज शुक्रवारी सकाळी* – पेट्रोल 96.62 रुपये प्रति लिटर , तर डिझेल 85.98 रुपये प्रति लिटर.
???? *हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.