सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 16 फेब्रुवारी 2021
📣 महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी – बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले – त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान तर दहावीची २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होईल.
📣 सोयाबीनचे गेल्या आठ वर्षांत पहिल्यांदाच प्रतिक्विंटल दर ४ हजार ९५५ रुपयांवर पोहोचले , शेतकऱ्यांकडे अजूनही २० ते २५ टक्के सोयाबीन शिल्लक आहे , बाजारातील तेजीचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असे वरिष्ठानी सांगितले.
📣 फास्टॅग वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी – जरी तुमच्या फास्टॅगमध्ये पुरेशी रक्कम नसेल , तरीही तुम्ही पुढे प्रवास करू शकाल कारण , सरकारने झीरो बॅलन्सवरदेखील प्रवास करण्याची सूट दिली आहे.
📣 भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस म्हणजे १७ आणि १८ फेब्रुवारीला राज्यात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी गारपिट सुद्धा होईल.
📣 जर तुमच्या वाहनाला फास्टॅग नसेल तर तुम्हाला थर्ड पार्टी विमाही काढता येणार नाहीय – एप्रिल, 2021 पासून हा नियम लागू होणार – असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सांगितले.
📣 Vi म्हणजे वोडफोन आयडीआय कंपनीने आपल्या प्रिपेड युजर्ससाठी एक खास ऑफर जारी केली , त्यानुसार ही खास ऑफर आहे ,नव्या ऑफरनुसार 249 रुपयांचे –
📣 किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना – आता रात्री 12 ते सकाळी 6 या कालावधीत ,अनलिमेटेड हायस्पीड डेटा मिळणार आहे.
📣 सर्व सामान्यांचे याकडे जरी लक्ष नसले तरी – पेट्रोल डिझेलच्या दरातील वाढ अजून पण चालूच आहे – मंगळवारी सुद्धा पेट्रोल दर ३० पैशांनी, तर डिझेल ३५ पैशांनी महागले.
📣 *तसे आज बुधवारी सकाळी* – पेट्रोल 95.75 रुपये प्रतिलिटर , तर 86.72 रुपये प्रतिलिटर झाले आहेत.
🪀 *हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा