सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 13/01/2021
???? *सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट १३ जानेवारी २०२ १ बुधवार*
???? एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते, पण त्याचा हा मान , एका आठवड्या पुरताच टिकून राहिला आहे
???? आता ते जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती झाले आहेत – तर Amazon चे संस्थापक जेफ बेजोस हे , पुन्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत
???? इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील उद्योगांना स्वस्त दरात वीज देण्याबाबत शासन सकारात्मक असून पुढील महिनाभरात याबाबतचा ठोस निर्णय होईल – असे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले
???? सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने त्यांच्या कोव्हिशिल्ड या कोरोना लसीची किंमत जारी केली आहे , त्यानुसार केंद्र सरकारला या लसीचा एक डोस 200 रुपयांना – तर बाजारात हा डोस १ हजार रुपयांना मिळणार आहे
???? MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने , आता निकाल वेळेत लागावा, आणि एका वर्षात दोनदा परीक्षा घेता यावी म्हणून – मुख्य परीक्षा ह्या ऑनलाइन घेण्याचे निश्चित केले
???? दरम्यान जुलै- ऑगस्टमध्ये होणाऱ्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या माध्यमातून , त्याचा पहिला प्रयोग केला होणार आहे – स्पर्धा परीक्षकांसाठी हि माहिती महत्वाची आहे
???? राज्यात गेल्या 5 दिवसांपासून बर्ड फ्लू मुळे 1839 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे , राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी याविषयी माहिती दिली
???? रेशन धारकांनी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक आणि एक सदस्याचा मोबाईल क्रमांक लिंकींग करुन घ्या –
???? अन्यथा १ फेब्रुवारी महिन्या पासून धान्य मिळणार नाही असे अन्नधान्य वितरण अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांनी सांगितले आहे
???? *सर्व अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा
हे तुम्हाला माहित आहे का :-
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
Comments are closed.