सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 12/01/2021
???? *सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट १२ जानेवारी २०२१ मंगळवार*
???? प्रतीक्षा संपली सिरमची ‘कोविशिल्ड हि लस , काल वापरासाठी बाहेर रवाना झाली , कंपनीला सुरवातीला २ कोटी डोसची ऑर्डर मिळाली आहे –
???? त्यापैकी ६५ लाख डोस आज देशातील विविध राज्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील – दरम्यान कोरोना वॉरियर्ससाठी याच लसीचा प्रामुख्याने वापर होणार आहे
???? राज्य सेवेची पूर्व परीक्षा १४ मार्च तर ,अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्चला होईल – दरम्यान मराठा आरक्षणानुसार ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून संधी मिळेल.
???? असे असले तरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपर्यंत असेल त्यांना ‘ईडब्ल्यूएस’ अंतर्गत संधी दिली जाईल – १५ जानेवारीपर्यंत सुधारित अर्ज भरून घेतले जातील – असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे
???? विठ्ठलाच्या दर्शनासाठी २० जानेवारी पासून ऑनलाइन पासची गरज नसणार – असे काल मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले
???? पुणे महापालिका प्रशासनाने आज मंगळवारपासून खासगी क्लासेस सुरु करण्यास परवानगी दिली आहे – तर पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढलेत
???? ऍक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी – आता वेळेआधी FD बंद केल्यास , दंड आकारला जाणार नाही – ही नवीन सुविधा सर्व नव्या मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवींवरही लागू असणार – असे बँकेकने स्पस्ट केले
???? महाराष्ट्रासाठी चिंतेची बातमी, राज्यात बर्ड फ्लूची अखेर एंट्री झाली परभणीत 800 कोंबड्या दगावल्या ,तर राज्याची राजधानी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात सुद्धा बर्ड फ्लूने एंट्री झाली
???? येत्या १६ तारखेपासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकारतर्फे केला जाईल – तर या लसीकरणात 13 लाख लोकांना प्रतिदिन लस देण्यात येईल – असे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले
???? *सर्व अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा
हे तुम्हाला माहित आहे का :-
???? *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
Comments are closed.