सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 09/03/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / ०९ मार्च मंगळवार

📣 राज्यातील सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना आपल्या गावातून शाळा, महाविद्यालयापर्यंत बसने जाण्यासाठी मोफत प्रवास सुविधा मिळणार – दरम्यान हि योजना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरु झाली आहे

📣 पीएनबी मध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे विलीनीकरण झाल्यानंतर ग्राहकांचे जुने आयएफएससी कोड – 31 मार्चपासून काम करणार नाहीत , तसेच 1 एप्रिलपासून चेकबुक सुद्धा नवीन वापरावे लागेल

📣 Hyundai India या कार कंपनीने एक खास ऑफर आणली , त्यानुसार कंपनी तर्फे विविध मॉडेलवर 1.5 लाखांपर्यंतची सूट दिली जात आहे – दरम्यान डिस्काऊंटची ही ऑफर 31 मार्च 2021 पर्यंत सुरु राहील

📣 नाशिक आणि मालेगाव मध्ये सर्व शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद – तर बार, खाद्यपदार्थ्यांचे ठिकाणे 50 टक्के क्षमतेने , सकाळी 7 ते रात्री 9 सुरू राहतील

📣 पुणेकरांसाठी खूशखबर – आता शहरातील सर्व वयोगटांतील लोक आपली सायकल घेवून मेट्रोने प्रवास करू शकतील – असे महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी सांगितले

📣 शेतकऱ्यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेत नोंदणी केली नसेल तर 31 मार्चआधी या योजनेकरता नोंदणी करा. 31 मार्च आधी अर्ज केल्यास होळीनंतर खात्यात 2000 रुपये येतील

📣 हवामान विभागाने दिलेल्या माहिती प्रमाणे विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा आदी जिल्ह्य़ामध्ये १० मार्चपासून , दोन ते तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे

📣 राज्यात सर्वच ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या , पुढे जात असल्याने उन्हाचा चटका वाढत आहे – दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयाच्या तापमानातील वाढ कायम राहणार आहे

🪀 *

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More