सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 08/02/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / ८ February सोमवार*

???? राज्याच्या कृषी धोरणात ‘एमएसपी’ अर्थात किमान आधारभूत किंमतचा समावेश करा – अशी मागणी काल – कॉंग्रेसच्या नेत्यांनी , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे

???? गेल्या आठवड्यापासून कडधान्य महाग झाली आहेत , मटकी १० रुपयांनी, सफेद वाटाणा ६ रुपयांनी वाढले आहे तर चण्याच्या दरात प्रत्येकी ५ रुपयांनी घट झाली आहे –

???? तसे सध्या मटकी होलसेल मध्ये १२० रुपये किलो तर किरकोळ १३० रुपये किलो झाली, चणाडाळ होलसेल ६४ रुपये किलो तर किरकोळ मध्ये ७५ रुपये किलो झाली आहे

???? कोरोना लसीकरणाचा खर्च राज्यांवर न ढकलता तो केंद्र सरकारनेच करावा – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान

???? प्रत्येक राज्यामध्ये मातृभाषेत शिक्षण देणारे , किमान एक मेडिकल आणि एक तांत्रिक महाविद्यालय असावं हे माझं स्वप्न आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

???? राज्यातील सर्वात मोठी कत्तल ! ,नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे बर्ड फ्लू मूळे तब्बल ९ लाख कोंबड्या मारल्या जातील – यासाठी पशु संवर्धन विभागाने १०० पथक तैनात केली आहेत

???? *निकाल अपडेट* – IBPS लिपिक भरती 2020 (CRP Clerks-X) पूर्व परीक्षा निकाल उपलब्ध – bit.ly/3tDZP0v

???? 5G सेवा संपूर्ण देशात एकत्र लाँच केली जाणार नाही – सुरूवातिला मोठ्या शहरात म्हणजे मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबादसारख्या शहरामध्ये अगोदर सुरवात होईल – असे एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल यांनी सांगितले

???? पालकांसाठी महत्वाची बातमी ! राज्यात पाचवी ते बारावीच्या शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु झाल्या , मात्र पहिली ते चौथीच्या शाळा अद्याप सुरु झाल्या नाहीत – अशात या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून –

???? पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी – MKCL नॉलेज फाउंडेशन कडून दुसऱ्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी मध्ये – सह्याद्री वाहिनीवर आज ८ तारिख सकाळी ७.३० पासून दररोज अध्ययन सुरु होणार आहे

???? *हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More