सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 07/01/2021

????  *सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट ०७ -जानेवारी-२०२१ – गुरुवार*

???? MPSC ची म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा 15 फेब्रुवारीनंतर होण्याची शक्यता आहे , अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठानी दिली आहे

???? हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे – राज्यात अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या पट्टयात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे –

???? तर कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात 9 जानेवारीपर्यंत – तसेच मराठवाडा आणि विदर्भात 8 जानेवारी पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

???? योगी सरकारचा मोठा निर्णय – २७ टक्के ओबीसी आरक्षणाची ३ गटात विभागणी होणार – यामध्ये मागासलेला, अति मागासलेला आणि अत्यंत मागासलेला असे ते तीन गट आहेत

हे सुद्धा पहा !

???? महाराष्ट्र राज्याच्या , कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर – अर्ज करण्याची मुदत राज्य शासनातर्फे वाढवण्यात आली  – आता 10 जानेवारीपर्यंत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला याठिकाणी अर्ज करता येईल

???? केंद्रीय आरोग्यमंत्रालायाने दिलेल्या माहिती नुसार ,  देशातील सर्वच जिल्ह्यांत 8 जानेवारीपासून कोरोना लसीचे ड्राय रन सुरू होणार आहे

???? माहिती अधिकारात घरघुती गॅसच्या डिलिव्हरी चार्जेसबद्दल HPCL कंपनीला माहिती विचारण्यात आली , कंपनीने सांगितले डिस्ट्रिब्युटरने ग्राहकाच्या दारात गॅस सिलिंडर पोहोचवणं ही त्याची जबाबदारी आहे –

???? तसेच ग्राहकाचं घर कोणत्याही बिल्डिंगमध्ये कितव्याही मजल्यावर असले , तरीही त्याच्याकडून जादाचे चार्जेस घेऊ नयेत, असं कंपनीने स्पष्ट पणे सांगितले  आहे.

????  *सर्व अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More