सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 06/01/2021

???? *सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट ०६ -जानेवारी-२०२१ – बुधवार*

???? स्पर्धा परीक्षा, प्रक्रिया रखडण्या मागे राज्य शासनच कारणीभूत आहे ,MPSC स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे यांनी दाखल केलेल्या माहितीच्या अधिकारात – असे उघड झाल्याचे त्यांनी सांगितले

???? संपूर्ण जगात विकसीत होत असलेल्या २५० कोरोना लशींपैकी , ३० लशी ह्या एकट्या भारतात तयार होत आहेत – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती

???? सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही, 7 जानेवारीला सरळ एक्स्प्रेसवेवर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येईल – अशी मोठी घोषणा स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी केली आहे

???? आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे , कोरोना लशीला मंजुरी मिळाल्यानंतर, आता पुढील हप्त्यात लसिकरण कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकते

???? UGC कडून सरकारी शिष्यवृत्तींच्या अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे , आयॊगाने सांगितले जे विद्यार्थी 2020-2021 या वर्षासाठी अजून अर्ज दाखल करु शकले नाहीत –

हे सुद्धा पहा !

???? किंवा जे यापूर्वी भरलेला अर्ज रिन्यू (Renew) करु शकले नाहीत, – त्यांना 20 जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल – सविस्तर माहिती साठी आपल्या कॉलेजला भेट द्या

???? केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2021 रोजी सादर केला जाणार , दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन भागांमध्ये असणार होणार , तर 29 जानेवारीपासून याची सुरुवात होणार आहे

???? हवामान विभागाने दिलेल्या माहिती प्रमाणे , मध्य महाराष्ट्रात आज आकाश मुख्यत: ढगाळ राहील – तर राज्याच्या उर्वरित भागात आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे –

???? तर पुढिल तीन-चार दिवस राज्यात रात्रीच्या थंडीचा कडाका कमी राहील , मात्र मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात ७ तारखेला थोडासा पाऊस वाढण्याची शक्यता आहे – असेहि हवामान विभागाने स्पस्ट केले

???? रेल्वेच्या भाडेवाढीबाबत भारतीय रेल्वेने सोमवारी एक निवेदन जारी केले- देशात कुठेही भाडेवाढ करण्याचा रेल्वेचा विचार नाही – असे रेल्वे विभागाने यामध्ये स्पस्ट पणे सांगितले

???? *सर्व अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More