आज सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट दि.05/01/2021
सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट ०५ -जानेवारी-२०२१ – मंगळवार
???? या वर्षाच्या पहिल्याच दिवशी , म्हणजे १ जानेवारीला ,देशात ६० हजार बालकांचा जन्म झाला – दरम्यान सर्वाधिक बालकांचा जन्म झालेल्या देशांमध्ये भारत त्यादिवशी पहिल्या क्रमांकावर होता
???? औरंगाबाद शहराचे संभाजीनगर, तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर तातडीने करा – अन्यथा तीव्र आंदोलन होईल – असा इशारा मनसेने दिला आहे.
???? खासगी क्षेत्रातील मोठी बँक HDFC Bank ने ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या मुदतठेव योजनेला 31 मार्चपर्यंत मुदत वाढ दिली , यानुसार कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाना फिक्स डिपॉजिट वर 6.25 टक्के व्याजदर मिळेल – असे बँकेने सांगितले
???? ब्रिटनमधून महाराष्ट्रात नवीन कोरोना लक्षण असलेले ८ प्रवाशी आले आहेत – यामध्ये ५ जण मुंबईत तर पुणे, ठाणे तसेच मीरा भाईंदर मध्ये प्रत्येकी एकेक जण आहे – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
???? प्रवेशपत्र अपडेट – भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मधील -1371 जागांचे प्रवेशपत्र आज उपलब्ध होईल – bit.ly/2L4Igom
???? उत्तर प्रदेशात गेल्या वर्षी २० लाख हेक्टरवर बटाट्याची लागवड झाली – यंदा वातावरण चांगले असल्यामुळे १६० लाख मेट्रिक टन बटाट्याचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे –
???? या बंपर उत्पादनामुळे बटाट्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर घट होईल – दरम्यान त्याचा परिणाम आपल्या राज्यात सुद्धा होईल – असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे
???? विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले राज्यात 12 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग चालू करण्याचे नियोजन सुरु झाले आहे
???? सोने आणि चांदीचे भाव ग्लोबल मार्केट्समध्ये 2 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहचलेत – त्याचा परिणाम भारतीय बाजारातही होत आहे
???? *दरम्यान आज मंगळवारी* – सोने 50 हजार 220 रुपये प्रति तोळा – तर चांदी 70 हजार 300 रुपये प्रति किलो झाली आहे
???? *सर्व अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा.
Comments are closed.