सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट दि.03-जानेवारी-2021
*सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट ०३ -जानेवारी-२०२१ – रविवार
भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’ ला सुद्धा इमरजन्सी वापराला मंजुरी मिळाली आहे , दरम्यान हि देशातील पहिली स्वदेशी लस समजल्या जाते.
कोविडसाठी लागणा-या आर्थिक खर्चाची तरतुद शासनाने तात्काळ उपलब्ध करून द्यावी – अन्यथा १५ जानेपारीपासून राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन केले जाईल -असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण मंहामंडळाच्या वतीने करण्यात देण्यात आला आहे.
इंडिगोचे औरंगाबाद-मुंबई विमान ८ जानेवारीपासून सकाळी १०.२० वाजता उड्डाण घेणार , तसेच सध्या औरंगाबाद मधून ही विमानसेवा आठवड्यातून ३ दिवस आहे. मात्र, ८ जानेवारीपासून हे विमान दररोज उड्डाण घेणार आहे.
शेतकरी प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारीला सिंघू सीमेवर ‘ट्रॅक्टर परेड’ काढतील ,काल झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी याविषयी माहिती दिली.
बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही प्रकारचे कर्ज देण्याची सुविधा चालू केली ,यासाठी ग्राहकांना बँकेत येण्याची गरज नाही – ग्राहक वेबसाइट, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंगद्वारे याचा लाभ घेऊ शकतील – असे बँकेने सांगितले.
मुंबईवर झालेल्या 26/11 या अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाइंड झाकी उर रहमान लखवी याला अटक करण्यात आली , मुंबईत झालेल्या या हल्ल्यात 166 लोक ठार तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते.
हे सुद्धा पहा !
राज्यभरातून अभियांत्रिकीसाठी 1 लाख 18 हजार तर फार्मसीसाठी 87 हजार 250 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर झाली आहे.
तर विद्यार्थ्यांना अर्जातील चुका सुधारणे, कागदपत्र जमा करणे यासाठी 3 आणि 4 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतची मुदत आहे – दरम्यान 6 जानेवारी रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊन 7 जानेवारीपासून पहिली प्रवेश फेरी सुरू होईल
एअरटेलने आता आपल्या 199 रुपयाच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा देण्याचा निर्णय घेतला आहे , आतापर्यंत एअरटेलच्या या पॅकमध्ये दररोज 1 जीबी डेटा मिळत होता.
*नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने* – काल जारी केलेल्या निवेदनानुसार ०१ जानेवारी २०२१ पासून UPI च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत असे स्पस्ट करण्यात आले.
हे तुम्हाला माहित आहे का :-
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
Comments are closed.