सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 02/03/2021
सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / ०२ मार्च मंगळवार*
???? 1 मार्च 2021 पासून स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी केवायसी अनिवार्य केले आहे , केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना केवायसी करणे बंधनकारक असेल असे बँकेने सांगितले
???? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनची मुदत ३१ मार्च , रात्री बारा वाजेपर्यंत वाढविण्यात आली – असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिलेत
???? राज्यातील सफाई कामगारांच्या मुलांना दिल्या जाणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीत , दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीची माहिती
???? स्टेट बँक 5 मार्च पासून ,कर्ज फेड करू न शकलेल्या कर्जदारांच्या मालमत्तांचा लिलाव करत आहे – मालमत्तेची माहिती ibapi.in/ या वेबसाइटसवर उपलब्ध आहे , तसेच आपण 033-40602403/40067351 या हेल्पलाईन कॉल करूनही माहिती घेऊ शकता
???? सोलापूर मध्ये एसटी स्टँड, रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी होणार – तसेच विनामास्क आढळल्यास १ हजाराचा दंड होणार – जिल्हाधिकारी संजीव जाधव यांचे आदेश
???? राज्यसेवा परीक्षा तोंडावर आलेली असताना पुणे शहरातील स्पर्धा परीक्षा क्लासेस पुन्हा एकदा १५ दिवसांसाठी बंद केलेत , क्लासेस चालकांनी क्लासेसला ५० टक्के उपस्थितीमध्ये परवानगी द्यावी – अशी मागणी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
???? अहवालानुसार महाराष्ट्र राज्य पोलिस दलात तब्बल २० हजार जागा रिक्त असून, जवळपास चार हजार पोलिस अधिकाऱ्यांची गरज आहे. रिक्त जागांमध्ये सर्वाधिक जागा पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या आहेत.
???? कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गव्हाच्या पेरणीमध्ये , राज्यात गतवर्षीपेक्षा ३८ टक्के वाढ झाली आहे. यंदा राज्यात १२ लाख ३१ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे.
???? इंडियन बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी – बँकेने 1 मार्चपासून एटीएममधून 2 हजारांच्या नोटा बंद केल्या आहेत – बँकेने दिलेल्या माहितीप्रमाणे इंडियन बँकेच्या ग्राहकांना , आता बँकेच्या शाखेतूनच 2 हजारांची नोट मिळू शकेल
???? *हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.