सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट दि.02-जानेवारी-2021
*सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट दि.०२ -जानेवारी-२०२१ – शनिवार*
???? जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनीच्या म्हणजे सीरम इन्स्टिट्यूटच्या *कोविशील्ड* – या कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.
???? नव्या वर्षाच्या सुरुवातीला होंडाने आपले BR-V SUV हे मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे , होंडा कंपनीने ही कार मे 2016 मध्ये लाँच केली होती.
???? LG, पॅनासॉनिक आणि थॉमसनसारख्या कंपन्यांचे होम अप्लायंसेस, विशेषतः टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिनचे दर जानेवारीपासून वाढतील असे या कंपन्यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे.
???? आरोग्य आणि ग्रामविकास विभागात 8 हजार विविध पदांसाठी मेगा भरती घेण्यात होणार आहे , दरम्यान आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाना दिल्या आहेत – आरोग्यमंत्र्यांची माहिती.
???? नव्या वर्षात महिलांसाठी राज्य सरकारकडून एक चांगली बातमी आहे ,संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत पुरवण्यासाठी सुरू केलेल्या 181 हेल्पलाइन ला नव्या वर्षात पुन्हा स्वतंत्रपणे महिलांसाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील महिलांना आता चोवीस तास मदतीचा हात मिळणार आहे.
???? नाशिक शहरात पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाच्या वापरावर २८ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे – उपायुक्त विजय खरात यांनी या संदर्भातील अधिसूचना काढली.
???? Vi म्हणजे Vodafone Idea आगामी 15 जानेवारीपासून दिल्लीमध्ये 3G सेवा बंद करणार आहे – त्यामुळे कंपनीने 15 जानेवारीपर्यंत 3जी सिमकार्ड 4G मध्ये पोर्ट करण्यास सांगितलं जात आहे.
???? दहावी फेरपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला , या विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे , तर 5 जानेवारीला त्याची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे
???? भारतात 29 जणांमध्ये नव्या कोरोनाचा संसर्ग झाला आहे , तर महाराष्ट्रात अद्याप कोरोनाचा हा प्रकार आला नाही – असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
???? *राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण* – मोहीम अंतर्गत , नव्या वर्षात येत्या 17 जानेवारीला पोलिओ लसीकरण होत आहे – दरम्यान सुरक्षित अंतर ठेवून लसीकरण करावे असे आव्हान करण्यात आले आहे .
*हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*