सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 01/03/2021
सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / ०१ मार्च सोमवार
???? राज्याच्या गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची – काल राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे
???? पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत , पुणे महानगरपालिका हद्दीत संचार निर्बंध कायम असेल – तर शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंदच राहतील – असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले
???? केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 साठी , GST म्हणजे वस्तू व सेवा कराचा वार्षिक रिटर्न भरण्याची मुदत वाढवून 31 मार्चपर्यंत केली आहे – काल केंद्र सरकारने याबाबत माहिती दिली
???? कोरोना सोबत राज्यात पुन्हा एकदा बर्ड फ्लूने सुद्धा डोके वर काढले आहे. याच पार्श्वभूमीवर नंदूरबारमधील नवापूर तालुक्यात देशातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन सुरु आहे.
???? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार, मार्चमध्ये होळी आणि महाशिवरात्रीसह – 4 रविवार आणि 2 शनिवारी मुळे एकूण ८ दिवस बँकांना सुट्टी असेल – त्यामुळे बँका बंद राहतील
???? *परीक्षा निकाल अपडेट* – मुंबई उच्च न्यायालयच्या 182 पदाच्या लिपिक भरतीचा निकाल उपलब्ध झाला – bit.ly/3r4Oi8G
???? शेतकऱ्यांनी 1 मार्चपासून दुधाची किंमत 100 रुपये प्रति लिटर करण्याचा निर्णय घेतला आहे – असे सतरोल खापचे प्रमुख रामनिवास लोहान यांनी सांगितले
???? शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! – वरिष्ठानी दिलेल्या माहितीप्रमाणे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधीच्या आठव्या हप्त्याची रक्कम 10 एप्रिलाच्या सुमारास पाठवणार
???? वाशिममध्ये दिलेल्या जमावबंदीच्या आदेशाला ८ मार्च सकाळी ८ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे – याबाबतचा आदेश जिलाधिकाऱ्यानी दिलेत
???? आज 1 मार्च 2021 पासून ,विजया आणि ई-देना या बँकांचे जुने आईएफएससी कोड बंद होतील – नवा आयएफएससी कोड हवा असेल तर बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तो मिळवता येईल
???? आजपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे , दरम्यान देशात ज्या रुग्णालयांमध्ये जन आरोग्य योजना , तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य योजना राबवल्या जातात , तिथे हे लसीकरण होणार आहे.
???? *हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.