पोलीस भरती संदर्भात गृहमंत्रालयाकडून नवीन GR जारी
Maharashtra Police Bharti 2021 New Update.
पोलीस भरती संदर्भात गृहमंत्रालयाकडून नवीन GR जारी- SEBC बाबत महत्त्वपूर्ण निर्णय..
गृह विभागाने 2019 मध्ये पोलिस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलिस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली.पोलीस भरतीसंदर्भात गृहमंत्रालयाकडून दि १३/०१/२०२१ रोजी नवीन GR जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, SEBC आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे गृह विभागाचा आदेश –
- SEBC चे आरक्षण न ठेवता पोलिस भरती प्रक्रिया पार पाडावी.
- SEBC आरक्षित ठेवण्यात आलेली पदे खुल्या वर्गात वर्ग करण्यात यावी.
- सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय २३/१२/२०२० तरतुदी नुसार संबंधित उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे EWS प्रमाणपत्र प्राप्त करून त्यांच्या इच्छेनुसार या भरतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीचा लाभ घेऊन या भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल.
- पोलीस भरती २०१९ साठी अर्ज सादर केलेल्या तथापि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा EWS लाभ न घेऊ इच्छिणाऱ्या मात्र उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचारात घेण्यात यावेत.
- खुल्या प्रवर्गातून भरती प्रक्रियेत सामाविस्ट शकणाऱ्या EWS उमेदवारांना वाढीव [फरकाची रक्कम] परीक्षा शुल्क भरण्यासाठी शुद्धिपत्रकाच्या दिनांकापासून ४5 दिवसांची मुदत देण्यात यावी.
- पोलिस महासंचालकांनी या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करावा.
वरील आदेश नुसार आता लवकरच पोलीस भरतीची कार्यवाही होणार असून,पोलिस भरतीचा मार्ग मोकळा झाला असून पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
स्रोत:-महाराष्ट्र शासन :- GR पहा
————**———–
*राज्याच्या पोलीस दलात १२ हजार ५३८ जागांसाठी भरती-आज गृहमंत्र्यांनी केली खूप मोठी घोषणा.
महाराष्ट्र पोलीस दलात १२५३८ जागा भरण्याची प्रक्रिया सुरू होणार-असे आज ११ जानेवारीला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले.
मागील तीन वर्षांपासून वारंवार घोषणा करून सुद्धा भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती , अखेर आज महत्वाचे अपडेट जारी झाले आहे.
*पहा काय म्हणाले गृहमंत्री :-
गृहमंत्र्यांनी आज सांगितले हि खूप मोठी भरती होणार आहे , यामध्ये सुरुवातीला ५ हजार ३०० जागाची भरती होईल, तर गरज पडल्यास येत्या ४ महिन्यात २० हजार जागा भरल्या जातील , असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
गृहमंत्र्यांच्या या घोषणेमुळे उमेदवारांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे, अनेक वर्षांनी इतक्या मोठ्या संख्येनं पोलीस भरती होणार आहे ,तसे पोलीस भरती विषयी आणखी काही अपडेट आले , तर ते आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू .
*दरम्यान आज ११ जानेवारीला* – राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलेली हि माहिती ,पोलीस भरती देणाऱ्या उमेदवारांसाठी खूप महत्वाची आहे ,आपण थोडासा वेळ काढून , इतरांना देखील शेअर करा.
हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
Comments are closed.