अर्ज एक-योजना अनेक : शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती !
कृषी योजनांचा लाभ बाबत माहिती पहा-शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे अपडेट
कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर 31 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत ,असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
*पहा काय म्हणाले कृषीमंत्री-सविस्तर माहिती पहा :-
राज्याच्या कृषीमंत्र्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून सर्व शेतकरी योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे घेऊ शकतात.
कृषि विभागाने आता महा-जीबीटी पोर्टलवर “शेतकरीयोजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाम “एकाच अर्णाद्वारे देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकन्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे.
मात्र याठिकाणी अर्ज करण्यासाठी किंवा योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडण आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा व कोठे करावा :-
- अर्ज करण्यासाठी आपण mahadbtmahait.gov.in/ या संकेत स्थळाला अर्ज भेट द्या “शेतकरी योजना” हा पर्याय निवडून अर्ज करा.
- हा अर्ज आपण मोबाईल, संगणक/ लॅपटॅाप/ टॅबलेट, तसेच CSC म्हणजे सामुदायिक सेवा केंद्राच्या माध्यमातून भरू शकता.
31 डिसेंबर २०२०[११ जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ] हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.- पोर्टलगरील प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे,मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.
- सर्व इच्छुक शेतक-यांनी महा डीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करावी.
अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे :-
- आधारकार्डशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक सोबत असावा.
- शेतीचा सात बारा उतारा.
- आधार कार्ड झेरॉक्स.
- बँक पासबुक झेरॉक्स.
- अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती च्या लाभार्थीना जातीचा दाखला.
*सर्व योजनांचा लाभ या एकाच अर्जाद्वारे* – मिळणार आहे , त्यामुळे हि माहिती , प्रत्येक शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे , आपण थोडा वेळ काढून , देखील अवश्य शेअर करा.
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*