आज इयत्ता 12 वी चा निकाल पहा.
Maharashtra Board HSC Result 2020
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर गुरुवार दिनांक १६/०७/२०२० रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
निकाल पहा [Link ]
१. www.mahresult.nic.in :- CLICK HERE
२. www. hscresult.mkcl.org :- CLICK HERE
३. www.maharashtraeducation.com :- CLICK HERE
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे१) ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन(http://verification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवार, दिनांक १७/०७/२०२० ते सोमवार दिनांक २७/०७/२०२० पर्यंत व छायाप्रतीसाठी शुक्रवार, दिनांक १७/०७/२०२० तेबुधवार, दिनांक ०५/०८/२०२० पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/Credit Card/ UPI/ Net Banking) याद्वारे भरता येईल,
Comments are closed.