देशात डिजिटल वोटर कार्ड झाले लाँच !

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा – 25 जानेवारीला देशात डिजिटल वोटर कार्ड लाँच झाले.

तुम्हाला माहिती असेल देशात 25 जानेवारी रोजी मतदार दिन म्हणून साजरा केला जातो ,दरम्यान येत्या मतदार दिनाला निवडणूक आयोगाकडून देशात डिजिटल वोटर कार्ड लाँच केलं जाणार आहे. ई-मतदार ओळखपत्राचे e-EPIC ऍपच्या माध्यमातून वाटप सुरू करणार आहे – तर  केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद हे या कार्यक्रमाचा प्रारंभ करतील.

‍पहा कसे आहे हे डिजिटल वोटर कार्ड ?

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहिती प्रमाणे , मतदार हे डिजिटल वोटर कार्ड [मतदान कार्ड] आधार कार्ड प्रमाणेच डाउनलोड करू शकतील. 

दरम्यान डिजिटल वोटर कार्डसाठी मतदाराच्या संपूर्ण माहितीची पडताळणी होईल, तसेच मतदाराच्या मोबाईल नंबरसह, त्याचा ईमेल आयडीही देणं अनिवार्य असेल. 

या कार्डवर दोन क्यूआर कोडही आहेत ,यात वोटर्सची संपूर्ण माहिती आणि त्याच्या भागाची माहिती देखील असणार आहे , निवडणूक आयोगाने या वोटर आयडी कार्डच्या हार्ड कॉपीचाही पर्याय ठेवला आहे. 

दरम्यान त्यासाठी 25 रुपये शुल्क भरावं लागेल , असे असले तरी या डिजिटल सुविधेमुळे कार्ड हरवण्याच्या , तसेच नंतर पुन्हा मिळवण्याच्या समस्येपासून सुटका होणार आहे.

असे तपासा आपले मतदार यादीतील नाव…

  • मतदार यादीतील आपले नाव तपासण्यासाठी आपण प्रथम निवडणूक आयोगाच्या (https://Electoralsearch.in) या वेबसाइटवर जावे.
  • त्यानंतर मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी स्वतःचे व वडिलांचे नाव टाकून आपले नाव तपासू शकता.
  • दुसर्‍या टॅबमध्ये आपण आपले नाव एपिकच्या (मतदार ओळखपत्र) संख्येनुसार पाहू शकता.

# 25 जानेवारी पासून देशात*  – डिजिटल वोटर कार्ड लाँच होणार आहे – हि माहिती प्रत्येक नागरिकांसाठी खूप महत्वाची आहे – आपण थोडस सहकार्य करा – इतरांना देखील शेअर करा. 

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More