हमीभाव म्हणजे काय ? तो कसा ठरवला जातो-जाणून घ्या !
*हमीभाव म्हणजे काय? तो कसा ठरवला जातो-जाणून काय घ्या आहे शेतकरी आंदोलनाशी याचा संबंध..
गेले काही दिवस तुमच्या कानावर MSP किंवा हमीभाव हा शब्द वारंवार पडत असेल हा काय प्रकार आहे आणि तो कसा ठरवतात , आणि त्याचा शेतकरी आंदोलनाचा कसा संबंध आहे ते समजून घेऊ ?
MPS म्हणजेच Minimum Support Price यालाच मराठीत किमान आधारभूत किंमत किंवा हमीभाव असे म्हटले जाते.
*पहा हमीभाव म्हणजे काय ?
▪️आता हमीभाव ही एक प्रणाली आहे, ज्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल एका ठराविक किमतीत खरेदी करण्याची हमी किंवा गॅरेंटी देते
▪️यामागचा उद्देश हा असतो की, बाजारात जरी शेतमालाच्या किंमतीत घसरण झाली, तेव्हाही केंद्र सरकार ठरवलेल्या हमीभावानेच शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करेल यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान टळेल.
▪️ याअंतर्गत सध्या 23 शेतमालांची खरेदी सरकार करत आहे , यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, शेंगदाणा, सोयाबीन, तीळ आणि कापूस या पिकांचा यात समावेश आहे.
*हमीभाव कसा ठरवतात ?
शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळणार ही महत्वाची घोषणा 2018 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती ,त्यानुसार जर 1000 हजार रुपये उत्पादन खर्च येणार असेल तर 1500 रुपये हमीभाव दिला जात असतो ,आणि महत्वाचे म्हणजे एखाद्या पिकाचा हमीभाव हा संपूर्ण देशातला एकसमान असतो. म्हणजे एक क्विंटल गहू महाराष्ट्रात ज्या दरानं सरकार खरेदी करतं असेल त्याच दरात तो पंजाबमध्येही खरेदी केला जातो.
*आता नव्या कायद्यात काय प्रॉब्लेम आहे ? – केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा अधिक संबंध खासगी व्यापाऱ्यांशी येऊ शकेल. त्यामुळे सरकारने ठरवलेल्या हमीभावाला किंमत उरणार नाही आणि व्यापारी किमती पाडतील, अशी भीती आंदोलक शेतकऱ्यांना वाटतेय , त्यामुळेच MPS हा या कायद्यातील महत्वाचा वाद आहे.
*हमीभाव विषयी असलेले* – हे नॉलेज अपडेट आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे , आपण इतरांना देखिल अवश्य शेअर करा.
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
Comments are closed.