शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी-गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना होणार पुन्हा सुरु*
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2022
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना.Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2022
तुम्हाला माहिती असेल, शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, त्याचे कुटुंब उघड्यावर येऊ नये, यासाठी राज्य सरकारने 6 वर्षापूर्वी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु केली होती.
मात्र, एप्रिल-2022 पासून ही योजना खंडीत झाली होती. दरम्यान राज्य सरकारने ही योजना पुन्हा एकदा नव्याने सुरू केली आहे.
*पहा या योजने विषयी*
शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास या योजनेतून दोन लाखांपर्यंत मदत केली जाते. तसेच, एक अवयव निकामी झाल्यास एक लाख, तर दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाखांची मदत केली जाते.
विशेष म्हणजे, विम्याचा हप्ता शासन भरत असल्याने शेतकऱ्याला पैसे भरावे लागत नाहीत.
शेतकरी अपघात विमा योजनेत – रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्याने, अंगावर वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून हत्या, हिंस्र जनावरांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत्यू, दंगल व अन्य अपघातांचा समावेश करण्यात आला आहे.
*योजनेचे नियम व अटी* – मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या नावावर सात/बारा उतारा असावा. तसेच शेतकरी 10 ते 75 वर्षे वयोगटातील असावा.
*असा करा अर्ज* –
- अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्याच्या वारसदारास तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा लागतो.
- अर्जाचा नमुना कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मिळतो.
- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शासनाचे विमा सल्लागार अर्जाची प्राथमिक छाननी करून विमा कंपनीकडे अंतिम मंजूरीसाठी प्रस्ताव पाठवितात. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर ही मदत दिली जाते.
1. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी दावा अर्ज कुठे करावा?
उत्तर : अर्जदाराच्या वारसदाराने नजीकच्या तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अपघातानंतर 45 दिवसांच्या आत दावा अर्ज सादर करावा.
2. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी अर्ज कुठे करावा?
उत्तर : अर्जदाराने नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा.
3. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी वयोमर्यादा काय आहे?
उत्तर : १० ते ७५ वर्षे वयोगटातील शेतकऱ्याच्या कुटुंबातील २ व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल.
4. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत किती लाभ दिला जातो?
उत्तर : या योजनेअंतर्गत १ ते २ लाखांपर्यंत आर्थिक मदत केली जाते.
*आपण थोडस सहकार्य करा* – हि माहिती इतर शेतकऱ्यांना देखील शेअर करा.
Comments are closed.