आता फक्त १० मिनिटात मिळवा पॅन कार्ड ! ते हि मोफत !!
आता फक्त १० मिनिटात आपल्याला आपले पॅनकार्ड कार्ड काढता येणार आहे – आधार कार्डच्या मदतीने हे पॅनकार्ड काढता येणार आहे
पहा याविषयी आणखी सविस्तर ?
इन्कमटॅक्स विभागाने दिलेल्या माहिती प्रमाणे – इन्स्टंट पॅन सुविधेअंतर्गत पॅन कार्ड केवळ १० मिनिटात काढता येणार आहे, तसेच या सुविधेअंतर्गत आतापर्यंत जवळपास ७ लाख पॅनकार्ड देण्यात आली आहेत – महत्वाचे म्हणजे यासाठी कोणताही तपशील फॉर्म भरावा लागत नाही.
त्यासाठी आपण – www.incometaxindiaefiling.gov.in/e-PAN/ या वेबसाईट ला भेट द्या आणि Get New Pan या पर्यावर क्लिक करा.
यात फक्त आधार नंबर च्या माध्यमातून पॅनकार्ड कार्ड काढले जाते – सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर – पॅनकार्ड कार्ड हे आपल्या मेल आयडी वर Pdf फॉरमॅट मध्ये पाठवले जाते किंवा आपण हि प्रोसेस पूर्ण झाल्यावर वापस येऊन Check Status / Download PAN या पर्यावर क्लिक करून देखील -आपण पॅनकार्ड डाउनलोड करू शकता.
मात्र आपण लक्षात घ्या कि – ज्यांच्याकडे आधीपासूनच पॅनकार्ड आहे त्यांनी पुन्हा पॅन कार्डसाठी अर्ज- न करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच जर कोणाकडे दोन पॅनकार्ड आढळले तरीही त्या व्यक्तीवर प्राप्तिकर कायद्याच्या कलम 272 बी अंतर्गत – गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
मात्र आपल्याला पॅनकार्ड ची आवश्यकता असेल तर हि खूप सोपी पद्धत आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
दरम्यान नक्कीच प्रत्येक* – नागरिकांसाठी हि सुविधा खूप महत्वाची आहे आपण थोडस सहकार्य करा- हि माहिती – इतरांना देखील शेअर करा.
हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
Comments are closed.