आता मिळणार रुग्णांना मोफत “रक्त” पुरवठा ! सविस्तर माहिती पहा ?
शासकीय रुग्णालयात दाखल सर्वच घटकातील रुग्णांना मिळणार मोफत रक्त !
राज्यभरातील शासकीय रुग्णालयात दाखल सर्वच घटकातील रुग्णांसाठी शासकीय रक्तपेढ्यांमधून आता नि:शुल्क रक्तपुरवठा होणार बाबत घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली. कोविडच्या पार्श्वर्भूमीवर शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्ण हा कुठल्याही योजनेत बसत नसला तरी त्याला नि:शुल्क रक्त व रक्तघटकांचा पुरवठा करण्यात येणार आहे.
यापूर्वी बीपीएल कार्डधारक किंवा डतर योजनांचे लामार्थी पात्र ठरत,मात्र आता सर्वच घटकातील रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध होणार आहे.
नवीन निर्णयानुसार शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्याला मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. शासकीय रुग्णालयात दाखल सर्वच घटकांना रक्तासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत.
हा निर्णय केवळ शासकीय रक्तपेढ्यांसाठीच आहे.खाजगी रक्तपेढयामध्ये रक्तासाठी सेवाशुल्क कायम राहणार आहे.
शासकीय रक्तपेढ्यांमधून आता नि:शुल्क रक्तपुरवठा होणार हि माहिती प्रत्येकासाठी नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण इतरांना देखील हि माहिती शेअर करा.
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
Comments are closed.