रेल्वेचे काउंटरवर बुक केलेलं तिकीटही ऑनलाईन रद्द करता येणार…
आता काउंटरवर बुक केलेलं तिकीटही ऑनलाईन रद्द करता येणार – पहा कशी IRCTC ची योजना
सोशल डिस्टंसिंगचे नियम लक्षात घेऊन रेल्वेने कोरोना काळात एक खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्याअंतर्गत आता तुम्ही घरी बसून रेल्वेचे काउंटरवरून घेतलेले तिकीटही रद्द करू शकता.
कसा आहे IRCTC चा नियम :- IRCTC च्या नव्या नियमानुसार ऑनलाइन तिकीट रद्द केलं जाऊ शकतं ,त्यासाठी महत्वाचे म्हणजे तिकीट खरेदी करताना तुमचा वैध मोबाइल क्रमांक द्यावा लागतो , म्हणजे जर तुम्ही तिकीट काढताना योग्य नंबर दिला नाही तर तुम्हाला काउंटरवरून घेतलेले तिकीट ऑनलाईन रद्द करता येणार नाही.
अशाप्रकारे ऑनलाइन तिकीट रद्द करु शकता :-
- यासाठी आपण www.operations.irctc.co.in/
ctcan/SystemTktCanLogin.jsf या लिंकला भेट द्या , त्या पेजवर आल्यावर तुमचा पीएनआर नंबर, ट्रेन नंबर आणि कॅप्चा टाका त्यानंतर सबमिट करा. - नंतर मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी टाका ,हा ओटीपी त्याच नंबरवर येईल जो तुम्ही तिकीट बुक करताना दिला होता , ओटीपी नंतर तुम्हाला तुमचा पीएनआर नंबर वॅलिडेट करावा लागणार नंतर Cancel Ticket च्या ऑप्शन वर क्लिक करा.
- यानंतर तुमची जी रिफंडची अमाउंटची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, दरम्यान त्याचा फोटोही तुम्हाला तिथं मिळू शकेल.
हे सुद्धा पहा !
यामध्ये एक लक्षात घ्यायाचे आहे , जरी तिकीट ऑनलाईन रद्द केले तरीहि , याचं रिफंड तुम्हला काउंटरवर मिळणार आहे , त्यासाठी हि प्रोसेस झाल्यानंतर तुमचं तिकीट घेऊन पीआरएस काउंटर आपण भेट द्या.
हे सुद्धा पहा !
>> Whatsaap द्वारे कसे बुक करता येईल घरगुती गॅस सिलिंडर
>> पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करा – अन्यथा निष्क्रिय झाल्यास भरवा लागणार दंड !
भारतीय रेलवे कडून आलेले हे अपडेट :- आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे , थोडस सहकार्य करा ,इतरांना अवश्य शेअर करा.
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
Comments are closed.