स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी-जाणून घ्या कशी आहे योजना

15 जानेवारी पर्यत केंद्र सरकार कडून-स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी , जाणून घ्या कशी आहे योजना.

केंद्र सरकार पुन्हा एकदा स्वस्त दरात सोनं खरेदी करण्यासाठी – सॉव्हरेन गोल्ड बाँड सुरवात झाली आहे ,जर सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपण 11 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यत  यामध्ये सोने खरेदी करू शकता. 

‍ जाणून घ्या सॉव्हरेन गोल्ड बाँड बद्दल आणखी :-

सॉव्हरेन गोल्ड बाँड वर्षातून ५ वेळेस उपलब्ध होतात –  रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया ,भारत सरकारतर्फे हे बाँड जारी करत असते.

तसे पाहिले तर 2015 मध्ये सॉव्हरेन गोल्ड बाँडची सुरवात झाली, यामध्ये आपण एका आर्थिक वर्षामध्ये 500 ग्रॅम पर्यंत सोन्याचे बाँड खरेदी करू शकता तर कमीतकमी गुंतवणूक हि 1 ग्रॅमची असते. 

तर या बाँड ची किमंत हि सोन्याच्या शेवटच्या तीन दिवसातील किमतीचा विचार करून ठरवली जाते – हे बाँड पेपर आणि  इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये असतात.

या बाँडच्या आधारे तुम्ही बँकेतून कर्ज देखील घेऊ शकता – तसेच सोन्याचे भाव वाढल्यानंतर याचा लाभ मिळतोच – पण यावर वार्षिक 2.5 दराने व्याज सुद्धा मिळते – जे प्रत्येक ६ महिन्याला आपल्या खात्यात जमा होते.

सॉव्हरेन गोल्ड बाँडचा मॅच्युरिटीचा कालावधी 8 वर्ष असते. तथापि, गुंतवणूकीच्या पाचव्या वर्षानंतर यातून बाहेर पडत येऊ शकते.

हे बॉन्ड आपण पोस्ट तसेच एनएसई आणि बीएसईच्या माध्यमातून – तसेच आपल्या बँक शाखेतुन – अथवा आपल्या बँकेच्या वेबसाईट वरून ऑनलाईन खरेदी करू शकता – दरम्यान ऑनलाईन खरेदी केल्यास , ५० रुपये प्रति ग्राम चा डिस्काउंट दिला जातो. 

सोने खरेदीची हि योजना :-  15 जानेवारीपर्यत उपलब्ध आहे , हि महत्वाची माहिती आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा.

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट  :- जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More