Budget 2021 काय स्वस्त होणार आणि काय महागणार !
जाणून घ्या ! काय स्वस्त होणार , आणि काय महागणार – पहा महत्वाचे अपडेट*
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला , मात्र त्याचा सर्व सामान्यानावर काय परिणाम होईल , किंवा काय महाग काय स्वस्त होईल ते पाहणे खूप महत्वाचे आहे
पहा काय स्वस्त होणार ?
● सोनं आणि चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करून 12.5 टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे सोनं-चांदी स्वस्त होणार आहे.
● लेदरच्या वस्तूही स्वस्त होऊ शकतात , तसेच स्टील उत्पादनांवरची कस्टम ड्युटी घटवून 7.5 टक्क्यांवर आणण्यात आली आहे.
● तांब्यावरची ड्युटी कमी करून 2.5 टक्क्यांवर करण्यात आली आहे. त्यामुळे स्टील आणि तांब्याची उत्पादनं स्वस्त होतील.
● नायलॉन चिप, नायलॉन फायबरवरची बीसीडी घटून 5 टक्के करण्यात आली आहे , टनेल बोअरिंग मशीनवरची सूट रद्द करण्यात आली आहे.
हे सुद्धा पहा !
पहा काय महागणार ?
निवडक ऑटो पार्ट्सवरची ड्युटी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांच्या किमतीतही वाढ होणार आहे.
सोलर इन्व्हर्टरवरची ड्यूटी वाढवून 20 टक्के करण्यात आली आहे , तसेच कापसावरील कस्टम ड्युटी वाढवून दहा टक्के करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे परदेशातून आयात होणारे कपडेही महाग होतील.
कच्चं रेशीम आणि रेशमाच्या धाग्यांवरील सीमाशुल्क कर 15 टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या गोष्टीही महागतील.
याआधी मोबाइलच्या सुट्ट्या भागांवर 0 टक्के कस्टम ड्युटी होती , ती आता 2.5 टक्के वाढवण्यात आल्याने मोबाईल फोन महागणार आहेत.
केवळ मोबाईलच नाही, तर मोबाईलचे चार्जर तसेच हेडफोनही महाग होतील , तसेच दारूशी संबंधित पेय पदार्थांवरील अधिभार वाढविल्यामुळे मद्याच्या किंमतीही वाढतील.
*काय स्वस्त आणि काय महागणार* – याबद्दल हे अपडेट सामान्यांसाठी खरोखर खूप महत्वाचे आहे , आपण हे महत्वाचे अपडेट इतरांना देखील अवश्य शेअर करा.
हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Join Me”.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.