सावधान! मोबाईल अॅपवरून झटपट कर्ज घेणाऱ्यांसाठी “RBI” चा मोठा इशारा !
सावधान! मोबाईल अॅपवरून झटपट कर्ज घेणाऱ्यांसाठी ,RBI चा मोठा इशारा जाणून घ्या महत्वाचे अपडेट.
भारतीय रिझर्व्ह बँकने लोकांना अनधिकृत पद्धतीने डिजिटल प्लॅटफ़ॉर्मवर ,तसेच मोबाईल ॲपद्वारे झटपट कर्ज घेणाऱ्यांसाठी मोठा इशारा दिला आहे, त्यासाठी आरबीआयने बुधवारी २३ डिसेंबरला एक प्रसिध्दी पत्रक जारी केले आहे.
पहा काय सांगितले RBI ने :-
रिझर्व्ह बँकने सांगितले जर तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा मोबाइल अॅपच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी अर्ज करत असाल तर सावधान राहा यामाध्यमातून तुमच्या कागदपत्रांमध्ये घोटाळा केला जातो , तसेच उच्च व्याजदराने लोन देखील दिले जाते ,महत्वाचे म्हणजे या पद्धतीमध्ये पैशांच्या रिकव्हरीचा मार्ग देखील चुकीचा आहे.
असे प्लॅटफॉर्म तुम्हाला त्वरित कर्ज कागदपत्रांशिवाय देण्याचं आश्वासन देतील, पण तुम्ही सावधान राहणं गरजेचं आहे. तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड सोबत केवायसी [KYC] कोणत्याही अज्ञात लोकांसोबत किंवा अनधिकृत अॅपवर करू नये.
तसेच जर कर्ज घेत असाल तर त्या अॅपची आधी चांगल्या प्रकारे चौकशी करावी – दरम्यान अशा ॲप याबाबतची तक्रार आपण achet.rbi.org.in वर करू शकता – असेही रिझर्व्ह बँकने काल बुधवारी सांगितले आहे.
रिझर्व्ह बँकने दिलेली हि माहिती* – प्रत्येक नागरिकांसाठी खरोखर खूप महत्वाचे आहे ,आपण थोडा वेळ काढून – इतरांना नक्की शेअर करा.
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
Comments are closed.