राज्यात आरोग्य विभागात तातडीने होणार 16 हजार पदांची भरती.
राज्यात आरोग्य विभागात होणार 16 हजार पदांची तातडीने भरती.
राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
संपूर्ण राज्यात कोरोना चे संकट आहे, रुग्णांची संख्याही वाढत आहे.राज्यातील वाढते कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता आरोग्य विभागाने ही संपूर्ण भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबावावी अशी मागणी केली होती. येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यावेळी राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे.
त्या पार्श्वभूमीवर राज्यात ही भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. साधारणपणे भरतीच्या प्रक्रियेचा निर्णय हा कॅबिनेटमध्ये होत असतो. पण यावेळी भरतीचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून हे भरतीचे लवकरच आदेश निघतील अशी माहिती आहे.
कोणती पदे भरणार :-
अ वर्गातील दोन हजार पदे व ब वर्गातील दोन हजार पदे आणि क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्यांची पदे भरती करण्यात येणार आहे.
या विषयीचा व्हिडीओ पहा : स्रोत abp माझा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
[…] वाचा : राज्यात आरोग्य विभागात तातडीने होणार… […]
[…] वाचा: राज्यात आरोग्य विभागात तातडीने होणार… […]
[…] वाचा: राज्यात आरोग्य विभागात तातडीने होणार… […]
[…] वाचा: राज्यात आरोग्य विभागात तातडीने होणार… […]
[…] वाचा: राज्यात आरोग्य विभागात तातडीने होणार… […]