Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojna.
राज्यात शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात,वीज पडणे ,पूर ,सर्पदंश, विंचूदंश,विजेचा शॉक बसने इत्यादी. नैसर्गिक आपत्तीमुळे होणार अपघात, रस्त्यावरील अपघात,वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात या मुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते.घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने सन २००५-०६ पासून शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना कार्यान्वित केलेली आहे.सन २०१५-१६ मध्ये सदर योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना महाराष्ट्र राज्यात सुरु करण्यात आली आहे.
१.शेतकऱ्यांनी स्वतः किंवा त्याच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने ह्या योजनेत पुन्हा स्वतंत्ररित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही.शासनाकडून सर्व खातेदार शेतकऱ्यांचा विमा भरण्यात येतो.
२.या पूर्वी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणत्याही वेगळी विमा योजना लागू केली असल्यास अथवा विमा उतरविला असल्यास त्याचा या योजनेशी काहीही संबंध राहणार नाही.या विमा योजने अंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतील.
३.योजनेचा लाभ मिळण्यासाठी विहित केलेली प्रपत्रे /कागदपत्रे वगळता अन्य कोणतीही कागदपत्रे शेतकऱ्यांनी सदर करण्याची आवश्यकता नाही.
अ.क्र | अपघाताची बाब | नुकसान भरपाई |
१ | अपघाती मृत्यू | रु.२ लाख |
२ | अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे. | रु.२ लाख |
३ | अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे. | रु.२ लाख |
४ | अपघातामुळे दोन डोळा अथवा एक अवयव निकामी होणे. | रु.१ लाख |
१.महाराष्ट्र राज्यातील १० ते ७५ वयोगटातील ७/१२ धारक शेतकरी असणे आवश्यक.
२.ज्या नोंदी वरून अपघात शेतकर्याचे नाव ७/१२ वर आले असेल अशी संबधित फेरफार नोंद गाव नमुना नंबर ६-ड.
३.शेतकऱ्याचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गाव नमुना नंबर ६-क नुसार झालेली वारसाची नोंद.
४.अपघाताचे स्वरूपानुसार विहित केलेली इतर कागदपत्रे.
योजने बाबतचे शासन निर्णय :-पहा.
स्रोत- आपले सरकार
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!
Comments are closed.