अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना सविस्तर माहिती.

Apang Bij Bhandwal Yojana 

१. योजनेचे नाव :-

अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल.

२. योजनेचा प्रकार:- राज्यशासन 

३. योजनेचा उदेश:-

बेरोजगार अपंग युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे. या योजनेअंतर्गन अपंग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय ,धंदा, उद्योग, शेती पूरक उद्योग, सुरु करण्यासाठी लागणारे अर्थसहाय्य राष्ट्रीयकृत बँकेमार्फत परत फेडीच्या कर्जाच्य स्वरूपा बीज भांडवल उपलब्ध करुन देण्याची योजना आहे.

४. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे :-

अंध,अल्पदृष्टी,कर्णबधिर,अस्तिव्यंग व मतिमंद

५. योजनेच्या प्रमुख अटी :-
  • अर्जदार अपंग किमान ४०% अथवा त्यापेक्षा जास्त असावा.
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • अर्जदाराचे मासिक उत्पन्न रु.१०००००/- पेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष ते ५० वर्ष असावे.
  • अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे करणे आवश्यक आहे.
६.योजनेच्या लाभाचे स्वरूप :-

या योजने खाली अपंग व्यक्तींना रु.१.५० हजार प्रकल्प खर्चाच्या २०% अथवा कमाल रु.३००००/- एवढे समाज कल्याण विभागाकडून अनुदान बीज भांडवल स्वरूपात देण्यात येते.उर्वरित ८०% भाग बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध होते.

७. अर्ज करण्याची पद्धत :-

विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.

८. योजनेची वर्गवारी :-

आर्थिक उन्नती.

संपर्क कार्यालयाचे नाव ;-

जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण , मुंबई शहर /उपनगर व संबंधित बँक.

माहितीचा स्रोत

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like

Comments are closed.