Aadhaar card मध्ये बदल करण्यासाठी कुणी अतिरिक्त पैशांची मागणी केल्यास इथं करा तक्रार.
Aadhaar card मध्ये बदल करण्यासाठी कुणी अतिरिक्त पैशांची मागणी केल्यास इथं करा तक्रार – आधार कार्ड संबंधी महत्वाचे अपडेट
अनेकदा आधार कार्ड काढताना नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी माहिती चुकीची भरली गेल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.
त्यातच आधार केंद्रावरील संबंधित व्यक्ती माहिती दुरुस्तीसाठी अनेकदा नियमबाह्य रकमेची मागणी करते. मात्र याविरोधात तक्रार दाखल करता येते.
*ज्यादा फी शुल्क आकारल्यास येथे करा तक्रार: – UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार जर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ज्यादा फी संबंधित व्यक्तीने मागितल्यास 1947 या टोल फ्री क्रमांकावर तसंच help@uidai@gov. in या मेल आयडीवर देखील तक्रार नोंदवता येते.
*आधार अपडेट चे प्रकार :-
- बायोमेट्रिक अपडेट :-आयरिस,फिंगर प्रिंट,फोटो अपडेट करणे.
- डेमोग्राफिक अपडेट :- नाव,पत्ता,जन्म तारीख,वय,लिंग,मोबाईल,ई-मेल माहितीअपडेट करणे.
*आधार अपडेट किती चार्ज असतात*
- आधार अपडेटसाठी नेमके किती चार्ज लागतात याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.
- दरम्यान UIDAI कडून जारी झालेल्या दरानुसार आधार कार्ड मधील बायोमेट्रिक अपडेटसाठी १०० रुपये , तर डेमोग्राफिक तपशीला मध्ये बदलण्यासाठी ५० रुपये द्यावे लागतात.
- तसेच यूआयडीएआयच्या नियमांनुसार 5 ते 15 वयोगटातील मुलांचे बायोमेट्रिक अपडेट निशु:ल्क केलं जातं , तर आधार केंद्रावर आधार कार्डाच्या कलर प्रिंट साठी वेगळे चार्ज आकारले जातात.
- *दरम्यान आधार कार्डकडून असलेले हे अपडेट* – नागरिकांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा.
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
Comments are closed.